ठाणे जिल्हयामध्ये २० एप्रिल पुर्वी असलेले निर्बंध कायम -: जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर.

 


ठाणे :-  केंद्रीय आरोग्य विभागाने  ठाणे जिल्ह्याचा समावेश  हॉटस्पॉट मध्ये केला असल्याने ठाणे जिल्हयातील सर्व 6 महानगरपालिका, 2 नगर परिषदा, 2 नगरपंचायती तसेच ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या  कार्यक्षेत्रातील  प्रतिबंधित क्षेत्रांसाठी  दि.१७ एप्रिल 2020 रोजीच्या शासन आदेशामध्ये नमूद केलेल्या सवलती लागु असणार नाहीत. तसेच २० एप्रिल पुर्वी जिल्हाप्रशासनाने वेळोवेळी जे  निर्बंध लागु केले होते ते कायम असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जाहीर केले आहे.


तथापि, या सर्व क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तू व तद्नुषंगिक सेवा, जलसंधारणाची कामे, विविध रस्त्यांची पावसाळ्यापुर्वीची कामे, समृध्दी महामार्गाची कामे, महापालिकेतील अंतर्गत रस्ते, मल:निस्सारण, सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा व स्वच्छता, अत्यंविधीसाठी वापरली जाणारी वाहने, वीज पुरवठा सेवा, दुरसंचार व इंटरनेट सेवा, प्रसारमाध्यमे, पेट्र्रोलपंप, ऑईल, एलपीजी गॅस सेवा, Supply Chain व त्यांची वाहतूक व्यवस्था, बँका व शासनाने सूट दिलेल्या वित्तीय संस्था, त्यांना सहाय्यकारी असणाऱ्या IT व ITeS, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे स्थानिक स्वराज्य संस्थेचे, पोलीस विभागाचे, केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी, डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ, Takeaway/Home delivery सेवा देणारी रेस्टॉरंट, शासकीय कार्यालये (किमान आवश्यक कर्मचारी वर्गासह) सुरु ठेवणे इ.बाबतीत शासनाने तसेच जिल्हाधिकारी  कार्यालयाने वेळोवेळी काढलेले विविध आदेश, विविध शासकीय आस्थापनांनी निर्गमित केलेले परवाने, पासेस व इतर सवलती ( स्थानिक स्वराज्य संस्थेने स्थानिक क्षेत्र Containment Zone म्हणून निश्चित करुन सिलबंद केलेले क्षेत्र वगळून ) यांची पूर्ववत पध्दतीनेच अंमलबजावणी  सुरु राहिल.  तसेच याकामी आवश्यक असणारी सर्व अत्यावश्यक  वाहतूक व्यवस्था सुरु असेल असेही  जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. 


सदरच्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची दक्षता संबंधित विभागांनी  घ्यावी. 


या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.  तसेच  अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितां विरुध्द  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 व 56, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता, (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही श्री नार्वेकर यांनी दिला आहे.


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.