लेक माहेरचा कट्टा सांस्कृतिक सोहळा २०२०

 


ठाणे येथील सहयोग मंदिर हॉल मध्ये थाटात संपन्न......


लेक माहेरचा कट्टा महिलांसाठी हा फेसबुक वरील सर्वात मोठा समूह आहे. याबल समूहावर २,६५००० महिला असून  या समूहाचे संचालक ०९जणी असून या सर्व गृहिणी आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे सारिका प्रमोद ढाणे,पूनम दुसाने,वर्षा नागरे,कौसर शेख,कविता कोंडभर,राजश्री थोरात,सौजण्या गिरी,नीलम विसपुते,सुनंदा सुरवसे , समूहाचे अनेक कार्यक्रम होत असतात,या समूहाला अनेक पुरस्कार मिळाले या समूहांतर्गत महिलांना सामाजिक,आर्थिक,भावणीक,कौटुंबिक,कायदेविषयक,आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि मदत केली जाते. 
सहयोग मंदिर हॉल मध्ये जो कार्यक्रम झाला त्यामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली. रामदास बिवलकर, विकास इंगळे (फोटोग्राफी अकॅडमी),अनिल पाटील (उद्योजक ग्रुप), राहुल मळगावकर(वास्तुतज्ञ), रंजना सडोलीकर (सोशल वर्कर),राहुल केनिया(बिर्ला मुच्युल), राज ठाकरे(पॅशन टीम),संकेत,संगीता लावणीकर (जज),स्वप्नाली (नाटक मिटु) जज, गौरी (सौंदर्यवती), सायली विसपुते (कथक विशारद) जज त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये नृत्य स्पर्धा आणि नववधू स्पर्धा आयोजित केली गेली. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे नृत्य स्पर्धेत आणि नववधू स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला त्यातील बऱ्याच स्पर्धक ४० वर्ष  वयाच्या होत्या, कार्यक्रमामध्ये १५० च्या वर महिलांनी उपस्थिती दाखवली,कार्यक्रमामध्ये अनेक छोट्या छोट्या स्पर्धा घेतल्या गेल्या तसेच स्नॅक्स ठेवण्यात आला होते.महिलांसाठी रिटर्न गिफ्ट म्हणुन वेगवेगळ्या वस्तू देण्यात आल्या,अवनी जोशी यांनी अडमिन्स साठी स्वतः बनवलेलं रांगोळी ठसे आणले,शनया मसाले बनवणाऱ्या कंपनी ने सर्व महिलांसाठी मसाले दिले लकी ड्रॉ मध्ये रोहिता गणेश सातारकर यांना पैठणी मिळाली तर सरप्राईझ खेळामध्ये निलम गणेश पुजारी  व पुजा मोरे गिफ्ट मिळाले. यांना आशा प्रकारे कार्यक्रम झाला,आणि महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
तसेच हे फोटो विकास इंगळे सर यांच्या फोटोग्राफी अकादमी द्वारे काढण्यात आले आहेत आणि खूप उत्कृष्ट असे फोटो त्यांनी काढून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद ४K  चॅनेलचे संपादक यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमध्ये उपस्थिती दाखवून सर्व कार्यक्रम स्वतःच्या चॅनेल वर प्रक्षेपित केला त्याबद्दल धन्यवाद नेहा पगारे यांच्या मुलाने सुद्धा फोटो काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.