ठाणे ;- ब्रह्मांड आजाद नगर ठाणे येथे महिलांनी मेळा निमित्ताने महिलांच्या उपयोगातील वस्तू, खाद्य पदार्थ, गृह उपयोगी वस्तू चे स्टोल लावण्यात आले होते, ठाण्यातील अनेक महिलांनी या मेळाव्यात भाग घेत खरेदी केली.या कार्यक्रमाचे आयोजन अखिल ब्रमांड महिला मंडळच्या अध्यक्ष्या जयश्री कसबे व उषा रायचौधरी,जयश्री पोपट,नीता तळराजे,छाया धोपेश्वरकर, मनजीरी क्षेमकल्यानि यांनी केले होते. ठामपा
जेष्ठ नगरसेवक संजय भोईर व उषा भोईर यांच्या सह अनेक मान्यवर यांनि मेळ्यात उपस्थित लावली व आयोजकांचे कौतुकही केले.या मेळाव्यात विविध खेळ मनोरंजनात्म कार्यक्रम सादर करण्यात आले. मंडळा च्या अध्यक्षा जयश्री कसबे यांनी विभागातील सर्व महिला व नागरिकांचे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी केलेल्या सहकार्या बद्दल आभार मानले आहे.या कार्यक्रमात महिलांची उपस्थित उल्लेखनीय होती व खरेदी ही मोठ्या प्रमाणात करणयात आली