ठाणे :- कळवा होळीच्या सणाला सुरूवात होत आहे .त्याकरिता उद्याचा रविवारी नागरिक मोठया प्रमाणात बाहेर पडून होळीच्या सणासाठीची खरेदी करणार आहेत .सणांच्या कालावधीत रेल्वेने मेगाब्लाॕक घेऊ नये अशी नागरिकांची मागणी असते .त्यानुसार शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे आम्ही करीत आलेलो आहोत ..यावेळी मध्य , हार्बर व पश्चिम रेल्वेने उद्या मेगाब्लाॕक घेतलेला नाही .परंतु ट्रान्सहार्बर मार्गावर (ठाणे -पनवेल) उद्या मेगाब्लाॕक आहे .त्यामुळे ठाणे ते पनवेल मार्गाने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना प्रचंड ञास या पांच तासांच्या मेगाब्लाॕक मधे होणार आहे .रस्ते मार्गाने जादा गाड्या सोडल्यातरी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी अडकून पडणार आहेत .ठाणे ते पनवेल मार्गावर सरासरी १० मिनिटांच्या अंतराने रेल्वे लोकल सुटत असते ..तेवढी पर्यायी व्यवस्था रस्ते मार्गाने होऊ शकत नाही .बसथांब्यांवर पाकीटमार पर्स मोबाईल व दागीने चोरी करतात तर चौपट भाडे आकारुन *काही रिक्षावालेही* लूटतात...रेल्वे फक्त स्वतःची कामे वेळेवर उरकून घेते प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करीत नाही ..रेल्वे मेगाब्लाॕक वेळेवर संपऊन त्यांच्या अधीकार्यांकडून शाबासकी मिळवित असेलही परंतु प्रवाशांकडून शिव्याशाप घेते...त्यांची त्यांना सवय आहेतच व उद्या होळीच्याही शिव्या मिळतील... वरीलप्रमाणे सकाळी ११ ते ४ या वेळेत होणाऱ्या रेल्वे मेगाब्लाॕक साठी पर्यायी व्यवस्था शिवसेना कळवा विभागाने केलेली असून सदर मार्गावर ST, TMT, NMMT च्या जादा बसेस सोडण्यासाठी वरील आस्थापनांकडे विनंती केलेली आहे . तसेच रिक्षा संघटना यांचेही सहकार्य मिळणार आहे ...........वरील वेळेत शिवसेना , महिलाआघाडी, युवा व युवतीसेना पदाधीकारी छ.शिवाजी महाराज चौक कळवा येथे उपस्थित राहून प्रवाशांना सहकार्य करणार आहेत ......विजय देसाई कळवा शाखा यांनी म्हटले आहे.