पवार-ठाकरेंच्या योजनांसाठी अर्थसंकल्प, महाराष्ट्र विकासाला मात्र `स्थगिती'! आमदार निरंजन डावखरे यांची टीका

 






ठाणे -: ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या योजनांसाठीच अर्थसंकल्प सादर झाला असावा. त्यात संपूर्ण महाराष्ट्राऐवजी पुणे, सातारा, मुंबईला प्राधान्य देण्यात आले असून, राज्याच्या विकासाला `स्थगिती' देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाने कोकण, मराठवाडा, विदर्भासह उर्वरित महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली गेली. महाराष्ट्रात फूट पाडण्याचा महाविकास आघाडी सरकारचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीकडून कोकण विकासाची `वायफळ बडबड' असून, कोकणासाठी एकही मोठा प्रकल्प जाहीर करण्यात आलेला नाही. मुंबई-पुण्यात मुद्रांक शुल्काचा १ टक्के दिलासा देताना, पेट्रोलवरील एक टक्का दरवाढीने समस्त जनतेच्या खिशावर डल्ला मारला गेला. मेटाकुटीला आलेल्या जनतेवर आणखी महागाई लादण्याचा हा प्रकार आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटले आहे.
स्मारक विकास निधीची घोषणा करताना तुटपुंजी ३० कोटींची तरतूद केली. त्यातून केवळ चौथरेच उभारण्याची सरकारची योजना असेल. या योजनेतून स्वातंत्र्यवीर सावरकर, वसंतराव नाईक, शिवाजीराव देशमुख यांचा सोयिस्कर विसर पडला, हे निश्चित. ग्रामीण जनतेचे वाहन असलेल्या एस. टी. त वायफाय, नव्या बसचे स्वप्न दाखविले जात असताना, अनेक ठिकाणी डिझेलअभावी एस. टी. च्या फेऱ्या बंद पडल्या. कारण एसटीकडे पैसेच नाहीत. त्याबाबतही सरकारला आठवण राहिलेली नाही, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची यशस्वी जलयुक्त शिवार योजना केवळ मुख्यमंत्री जलसंधारण योजनेच्या उद्घाटनासाठी बंद केली, असे म्हणावे का, असा सवालही निरंजन डावखरे यांनी केला.

 





Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.