ठाणे :- कळवा येथील पारसीकबोगदा ते आनंदनगर , भोलानगर या जलदगती रेल्वेलाइन शेजारच्या दुतर्फा असलेल्या नागरी वस्तीमधे दर वर्षी होळी व रंगपंचमीचा सण साजरा केला जातो .परंतु सदर सणाच्या वेळी काही टारगट मुले, समाजकंटक, मद्यपी व्यक्ती चालत्यां रेल्वे गाड्यांवर रंगाचे फुगे, पाणी भरलेले फुगे व दगड कींवा इतर वस्तू फेकतात.त्यामुळे यापुर्वी बरेच प्रवासी जखमी झालेले आहेत ...सदरची गंभीर बाब रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीसांचे नीदर्शनास आणून दिल्यावर मागील काही वर्षे रेल्वे पोलीसांकडून सदर दिवसी गस्त गस्त घातली जाते ..त्यांचे समवेत आनंदनगर, वाघोबानगर, पारसीकबोगदा परीसर, भास्करनगर, पौडपाडा येथील शिवसेनेचे स्थानीक शाखाप्रमुख व त्यांचे सहकारी उपस्थित राहून पोलीसांना सहकार्य व नागरीकांना मेगाफोन वरून मार्गदर्शन करतात..तसेच खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समीती कळवा यांचे सदस्य उपस्थित असतात ..तसेच सदर परीसरातील शिवसेनेचे व महिला आघाडीचे पदाधीकारी स्थानीक रहीवाशी व जाग्रुक नागरिकांचे सहकार्याने गस्त घालून नागरिकांना जागरुक करतात ..सदर कामी रेल्वे पोलीसांचे चांगले सहकार्य मिळते.पोलीसांचा चांगला वचक असल्याने अनुचीत प्रकार होत नाहीत .विनंतीला मान देऊन गस्त वाढऊन नागरिकांना दिलासा दीला जातो त्या बद्दल रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीस व कळवा स्टेशन मास्तर यांचे आभार विजय देसाई ,खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती कळवा यांनी मानले आहे
कळवा रेल्वे हद्दीत सणासुदीला चालत्या गाडीवर होणाऱ्या दगडफेकीला बसणार चाप.