ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू -- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

 


ठाणे :- ठाणे जिल्ह्यात ‛कोरोना' व्हायरसचा  संसर्ग वाढू नये तसेच तात्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  जिल्ह्यामध्ये आजपासून  ‛आपत्ती व्यवस्थापन कायदा' लागू केल्याची घोषणा केली आहे. ठाणे जिल्हा मुंबई शहरालागत असल्यामुळे अनेक पर्यटक ठाणे जिल्ह्यामार्गे प्रवास करतात, अथवा वास्तव्यास असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंचा  फैलाव होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे  जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे जाहीर केले आहे. 


या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार , जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक  विभाग तसेच सेवाभावी संस्था यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून दैनदिन अहवाल सादर करावयाचा आहे. 


आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे, तसेच स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे, जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे इत्यादी कामे केली जाणार असून हा कायदा लागू केल्यामुळे आता आवश्‍यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्‍टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. खाजगी रुग्णालयांनी सहकार्य करीत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत.


मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तात्काळ कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत. 


सेवाभावी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. पोलीस यंत्रणेने समाज माध्यमातून अफवा अथवा गैरसमज पसरविणारेशोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांचे प्रबोधन करावे असे आदेश जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी दिले आहेत. 


जनतेमध्ये भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये म्हणून व्यापक प्रचार, प्रसिध्दी, जनजागृती केली जात आहे. शाळा अंगणवाडी मध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. शहरात  वेगवेगळ्या ठिकाणी आजारासंबंधी प्रबोधनपर फलक, होर्डीग लावण्यात आले आहेत. चित्रपटगृह, केबल नेटवर्कद्वारे माहिती दिली जात आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, बँक, एटीएम आदी ठिकाणे वारंवार निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 


सद्यस्थितीत शहर-जिल्ह्यात 'करोना'चा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रुप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या' घाबरू नका पण सतर्क रहा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी  श्री नार्वेकर यांनी केले आहे.


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.