दिव्यात तात्पुरते २५-३० खाटांचे रुग्णालय उभारा.

 


दिव्यात तात्पुरते २५-३० खाटांचे रुग्णालय उभारा.
 चार लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या दिव्यातील
 जनतेच्या सुरक्षेसाठी ईमेलद्वारे केला पत्रव्यवहार.
ठाणे :- जगात कोरोना विषाणुने हाहाकार माजवला आहे.त्यामुळे नेहमीच आरोग्याच्या सरकारी सुविधेपासून वंचित राहीलेला ठाणे शहरातील दिवा विभाग चर्चेत आहे.या शहराची लोकसंख्या ४ लाखांच्यावर जावून पोचली तरी प्राथमिक सुविधेसाठी आरोग्य केंद्राची सुविधा नाही,त्यामुळे येथे राहणाऱ्या मजूर,गोरगरीब व गरजवंतांनी कल्याण-डोंबिवली जावून खर्चिक तपासणी करायची का असा प्रश्न दिव्यातील नागरिकांना पडला आहे.म्हणून किमान या महामारीच्या काळात दिव्यात तात्पुरते २५-३० खाटांचे तरी रुग्णालये उभारा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा उपविभागिय अध्यक्ष श्री प्रशांत गावडे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त  विजय सिंगल यांच्याकडे ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. 


   ठाणे महानगर पालिकेच्या अधिकार कक्षात दिवा हा विभाग देखील येतो. दिव्यातील प्रभाग क्रमांक २७ आणि २८ हे ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात. काही वर्षांपूर्वी इथे दिवा प्रभाग समितीही अस्तित्वात आली.आज घडीला दिव्यातील लोकसंख्या ही अंदाजे ४ लाखांच्या वर जाऊन पोहचली आहे. मात्र त्याप्रमाणात दिव्यात लागणाऱ्या प्राथमिक सुविधा या मात्र इथे उपलब्ध नाहीत.
    सध्या राज्य सरकार,केंद्र सरकार आणि सामान्य जनता सगळेच या कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी तयारी करीत आहे. परंतु दिव्यात मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे. आजच्या घडीला दिव्यातील डॉक्टर काम बंद करून सुट्टीवर आहेत, अजून कित्येक डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडले नाही आहेत. त्यामुळे किरकोळ ताप, सर्दी, खोकला याच्यावर नागरिकांना ईलाज घेता येणे कठीण होऊन बसले आहे. आज दिव्याच्या आजूबाजूच्या ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण इथे कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यावर तिथल्या पालिका रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 


   सध्या चार लाख लोकसंख्येच्या दिव्यात मात्र एकही पालिकेचे रुग्णालय नाही. देव न करो पण जर का उद्या दिव्यात एखादी कोरोनाची केस सापडली तर संपूर्ण दिव्यात हाहाकार उडेल.अशा परिस्थितीत ठाणे किंवा डोंबिवली इथल्या पालिका रुग्णालयात जाण्यावाचून दिवेकरांना जावे लागण्याची शक्यता आहे.यातूनही अधिकच या आजाराचा संसर्ग वाढू शकतो. राज्य सरकारच्या माहितीप्रमाणे आता महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजच्या दिशेने प्रवास करतोय,त्यामुळे ही वेळ येण्यापूर्वीच दिव्यात प्रतिबंधात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  ईमलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
    दिव्यात तात्पुरत्या स्वरूपात किमान २५ ते ३० खाटांच्या क्षमतेच्या रुग्णालयाची उभारणी करण्यात यावी, ज्यात व्हेंटिलेटर आणि OPD ची सुविधाही नागरिकांना उपलब्ध करून द्यावी ज्यामुळे दिवेकर नागरिकांना याचा फायदा घेता येईल. आपल्या अधिकाऱ्यांमार्फत दिव्याच्या परिस्थिती बद्दल माहिती घ्यावी आणि Prevention is better than Cure या इंग्रजी म्हणीप्रमाणे आपण दिवेकरांच्या आरोग्यासाठी या पत्राची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मागणी करण्यात आली आहे.


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.