आमदार प्रताप सरनाईक यांनी सादर केलेल्या लक्षवेधीमुळे मेट्रोचा भोंगळ कारभार उघड

 


ठाणे :- प्रतिनिधी


ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील घोडबंदर रोडवर मेट्रोच्या कामाला सुरवात झाली त्यावेळी कासारवडवली, भाईंदर पाडा व गायमुख येथे उड्डाणपूल बांधून त्यावर मेट्रो पिलर उभारावे अशी विनंती मेट्रो प्रशासनाला आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. परंतु यांच्या मागणीचा विचार न करता मेट्रो प्रशासनाने तांत्रिक बाबी लक्षात न घेता मेट्रोच्या कामाच्या  निविदांमध्ये उड्डाणपुलाचा अंतर्भाव न करता निविदा काढून कामाला सुरवात केली. 
त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पात आधी त्यासंदर्भात लक्षवेधी सुचना टाकली असता मेट्रोने आपली चुक कबुल करून त्या ठिकाणी उड्डाणपुल तयार करण्याचे लेखी आश्वासन दिले. परंतु एकदा मेट्रोच्या पिलरची उभारणी झाल्यानंतर त्या ठिकाणी उड्डाणपुल कसे काय उभारणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. खरेतर नागपुर व मिरभाईंदरच्या धर्तीवर एलिवेटेड उड्डाणपुलाची गरज असताना परस्पर मेट्रोचे काम चालु करणे किती योग्य आहे असे प्रश्न घोडबंदर रोड वरील नागरिक करत आहेत . त्यामुळे नगरविकास मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासंदर्भात तक्रार केलेली असून या तिन्ही उडडाणपुलासह मेट्रोचे काम चालु करावे अशी विनंती केली आहे. जर हे काम सोबत झाले नाही तर घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी निर्माण झाली तर मेट्रो प्रशासनाला जबाबदार धरावे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. 
घोडबंदर रॊडवरील मेट्रोच्या कास्टिंग यार्डच्या कामासाठी कोलशेत व हिरानंदानी येथील ज्या जमिनींचा वापर केला आहे. त्याच्या भाड्याबद्दल व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांना मोबल्याबद्दल मात्र मेट्रो प्रशासनाने उत्तर देणे टाळले आहे. तसेच कासारवडवली येथील मेट्रोचे आरक्षण ज्या जमिनींवर टाकले गेले होते ती जमीन हरित पट्ट्यामधील असून त्यामधील काही जमिनी या आदिवासींच्या असल्याचे मेट्रो प्रशासनाला तब्बल ५ वर्षानंतर कळाले त्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांना आश्चर्य व्यक्त केले . ज्यावेळेस शासनातर्फे आरक्षण टाकले जाते त्यावेळेस त्या जमिनीच्या मालकीबाबत विचार करूनच आरक्षण टाकले जाते याचाच अर्थ मेट्रो प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची त्यावेळी चुकी झाली असल्याचे मेट्रो प्रशासनाने मान्य करावे तसेच मोघर पाडा येथील ज्या जमिनीवर मेट्रो कारशेडचे आरक्षण टाकले जात आहे ती जमीन देशील हरित पट्ट्यामध्ये आहे. याचा मेट्रो प्रशासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाच्या उत्तरातून व कारभारातून मिळाले असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी खेद व्यक्त केला व याबाबतीत नगरविकास मंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत एका बैठकीचे आयोजन करावे व तोपर्यंत बघबीळ ते गायमुख पर्यंतचे मेट्रोचे काम थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी केली आहे.


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.