ठाणे -
: ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेऊन, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे लोक अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानानुसार ठाण्यातील महत्वाच्या १५ ठिकाणी आज झालेल्या स्वाक्षरी अभियानात सहभाग घेऊन हजारो ठाणेकरांनी वाढत्या ट्रॅफिकविषयीची नाराजी व्यक्त केली.
भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे व ठाणे शहराध्यक्ष, आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाणे शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दररोज वाहतूककोंडी होत आहे. ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी मेट्रो व कोपरी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत शहरातून जाणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करावी, तसेच भाईंदर-भिवंडी ते उरण आणि उरण ते भिवंडी-भाईंदर वाहतुकीसाठी ठाणे शहराला वगळून पर्यायी माध्यमे आणि मार्ग विकसित करावेत आणि वाहतुकीचा जाच सहन करणाऱ्या ठाणेकरांना मुंबईत जाता -येता भरावा लागणारा टोल पूर्णपणे माफ करावा आदी मागण्या भाजपाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

वाढती वाहतूककोंडी आणि त्यामुळे होणारे अपघात, तसेच वाढत्या प्रदूषणाविरोधात भाजपाच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात रेल्वे स्थानक, मल्हार चौक, विजय नगरी (वाघबीळ नाका), हिरानंदानी इस्टेट, ब्रह्राळा तलाव, गोल्डन डाईज नाका, सिडको, आनंद टॉकीज आदी १५ ठिकाणी स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ठाणेकरांनी ट्रॅफिकविषयी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिम व ०८०४५९३६०७७ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे लोक अभियानला पाठिंबा द्यावा, असे आवाहन खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे व आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी केले आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनवर लोक अभियानाला सुरुवात झाली. या वेळी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, नगरसेवक संदिप लेले, नारायण पवार, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे आदी उपस्थित होते.