.राज्यसभेतील एकूण बारा खासदार यांची शिफारस राष्ट्रपती महोदय करतात.त्यामुळे आपल्या या अधिकाराचा वापरकरत राष्ट्रपती यांनी रंजन गोगाई यांची निवड केली आहे.रंजन गोगाई हे 17 नोव्हेंबर 2019 रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. त्या आधी त्याच्या अध्यक्षतेखाली खाली असणाऱ्या खंडपीठाने कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या खटल्याचा निकाल सुनावला. तर अयोध्ये सोबतच आसाम एन आर सी,राफेल,सरन्यायाधीश चं कार्यालय माहीती अधिकार कक्षेत आणण्यासारखे अति महत्वाचे निकल दिले होते.गोगाई यांच्या राज्यसभेत निवडीवरून आव्हाड यांनी भाजपावर खोचक टीका ट्वीटर वरून केली आहे. राज्यसभेत जायचे असेल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना आणि सत्ताधारी खूष होतील असे निर्णय द्या असा टोला ही भाजपला लगावला.तर बाबासाहेब बघत आहात ना ..,वरिष्ठ अधिकारी आणि न्यायमूर्ती ह्यांना निवृत्ती नंतर दहा वर्षे राजकारण प्रवेश बंदी ही काळाची गरज आहे तरच लोकशाही वाचेल अशी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वि मध्ये म्हटलं आहे
सत्ताधारी खूष होतील असे निर्णय द्या आणि खासदार व्हा.मंत्री जितेंद्र आव्हाड याची भाजपा वर टीका.