ठाणे - : ज्ञान व आकलन शास्त्रशुद्ध पद्धतीने नवीन पिढीला व्हावे यासाठी दशावतार कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. दशावतार ही महाराष्ट्रातील फार जूनी लोककला या कलेचे जतन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ठाणे महापालिका उप महापौर पल्लवी कदम यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग,दशावतार नाटक महोत्सव कार्यक्रमात केले.
यावेळी गटनेता ठाणे म. न. पा. दिलीप बारटक्के, अध्यक्ष महाराष्ट्र हौसिंग फेडरेशन सिताराम राणे, नगरसेवक दशरथ पालांडे, माजी महापौर प्रमोद राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल ठाणे येथे दशावतार नाटक महोत्सव २०१९-२० या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम ७ मार्च पर्यंत रोज सांयकाळी ६.३०वाजता सुरु होणार आहेत. या कार्यक्रमाचे आस्वाद ठाणेकरांनी घ्यावा असे आवाहन उप महापौर कदम यांनी केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना उप महापौर पल्लवीकदम म्हणाले की, दशावतार ही लोककला भविष्यकाळात टिकून राहावी व या कलेची जोपासना व्हावी या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाकडून लोककला जपण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे.