महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार भरोसा सेल चे उदघाटन. ठाणे :- जागतिक महिला दिन निमित्तानेब राज्य पोलिस महासंचालक याच्या आदेशानुसार आज ठाण्यात भरोसा सेल चे उदघाटन सह पोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्या हस्ते करण्यात आले. भरोसा सेल या महिला बालकं व जेष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असा उपक्रम ठाणे पोलिसांनी सुरू केला आहे.पती व पत्नी यांच्या तील कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी समुपदेशन करणे, अडचणीत असणाऱ्या पोलीस महिलांना तातडीने मदत करणे,(बडी कॉप)शालेय विद्यार्थ्यांना मदत करणे पोलीस काका/दीदी),पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिलांना समुपदेशनव निरसन करणे(वुमन हेल्थ डेस्क),जेष्ठ नागरिकांचे समस्या चे निरसन करणे.महिला व मुलींच्या छेडछाड व रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथक,स्पेशल जुवेनाइल कोर्ट प्रोटेक्शन युनिट त्यात बालमजूर, लहान मुलाचे अपहरण, भिक्षा मागणं इत्यादी चा कम्युनिटी पोलीस स्कीम २०१९मध्ये लागू झाल्या ने भरोसा सेल मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. उदघाटन प्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार,उपायुक्त दीपक देवराज, उपायुक्त संजय जाधव,सहा.पोलिस आयुक्त नीता पाडवी, सहा.पोलीस आयुक्त चव्हाण मॅडम,सहा.आयुक्त किसन गवळी, सहा.आयुक्त सुनिल बाजरे तसेच इतर समाजसेवी संस्था च्या मान्यवर महिला उपस्थित होत्या
महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार भरोसा सेवा संकुला चे उदघाटन.