छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नवजात बालकांसाठी 30 बेडचा एनआयसीयू कक्ष सज्ज : महापौर नरेश म्हस्के

 


महापौरांसह आरोग्य समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश


 


ठाणे - : नवजात बालकांना अनेकदा जन्मानंतर एन.आय.सी.यू कक्षात ठेवण्याची वेळ येते, अनेक ठिकाणी हा एन.आय.सी.यू कक्ष उपलब्ध नसल्यामुळे बालकांना दुसऱ्या  रुग्णालयात हलवावे लागते अशी वेळ येवू नये यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यांना यश आले असून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एन.आय.सी.यू कक्षात नवजात बालकांसाठी 30 बेडची सोय उपलब्ध करुण्यात आली असून लवकरच हा कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती  महापौर यांनी दिली.  नुकतीच सोमवारी महापौरांनी राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत या कक्षाची पाहणी केली.  नवजात बालकांसाठी सुसज्ज अशा कक्षात बेडची संख्या वाढविल्याबाबत  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यकत करीत नवजात बालकांसाठी हा कक्ष लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.


          या पाहणी दरम्यान सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्‌या प्रमिला केणी,  अतिरिक्त आयुकत 1 राजेंद्र  अहिवर, वैद्यकीय अधिष्ठाता शैलेश नटराजन आदी ‍ उपस्थीत होते. छत्रपती शिवाजी रुग्णालयात एन.आय.सी.यू बेडची संख्या वाढवावी यासाठी आरोगय समिती सभापती केवलादेवी यादव यांच्यासह उपमहापौर व सदस्या पल्लवी कदम, साधना जोशी, नम्रता फाटक, ‍ शिल्पा वाघ, नम्रता घरत, राधाबाई जाधवर, फरझाना शेख, जमीला खान यांनी सतत प्रयत्न केले होते, तसेच याबाबत महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. महापौर यांनी आरोग्यविभागाशी सततची मागणी करुन तातडीने एन.आय.सी.यू कक्षातील बेडची संख्या वाढविण्याची मागणी केली.  छत्रपती  शिवाजी महाराज रुग्णालयात ठाण्यासह, कळवा, मुंब्रा  तसेच अनेक ठिकाणाहून गोर गरीब  महिला येत असतात. प्रसूतीसाठी येणाऱ्या  महिलांची संख्या याठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जन्मानंतर एखाद्या बालकास जर एनआयसीयू  कक्षाची गरज भासली तर गैरसोय होवू नये यासाठी या कक्षात आता 30 बेडची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नवजात बालकांना इतर रुग्णालयात नेण्याची गरज भासणार नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.


          30 बेडने सुसज्ज असलेल्या या एनआयसीयु कक्षाचे निजंर्तुकीकरण केल्यानंतर लवकरच हा कक्ष नवजात बालकांसाठी खुला करण्यात येणार असल्‌याचे वैद्यकीय अ धिष्ठाता शैलेश नटराजन यांनी नमूद केले. या एनआयसीयू  कक्षाचा लाभ आता नवजात बालकांना मिळणार असून हा कक्ष लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना देखील महापौरांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला दिल्या आहेत.


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.