ठाणे : महाराष्ट्र राज्यात IPS/ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहत असताना आता नवी मुंबई/ठाण्यातही ते वाहू लागले आहेत. पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले विवेक फणसळकर यांच्या बदलीची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरू झाली असून त्यांच्या जागी अनेकांची नावे पुढे येत असताना चार पोलीस अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर आहेत विशेष म्हणजे या चौघां नि यापूर्वी पोलीस दलाचे कामकाज हाताळले आहे.
राज्य शासनाकडून गेल्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू झाल्या आहेत. त्यानुसार, मागील काही दिवसांत अनेकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात आता मुंबईपाठोपाठ ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत.
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ३१ जुलै २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. येत्या जुलै महिन्यात त्यांच्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यापूर्वीच आता त्यांच्या बदलीची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारकडून मर्जीतील मंडळींची वर्णी विविध ठिकाणी लावली जात आहे. याचाच एक भाग म्हणून फणसळकर यांच्याही बदलीच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी आता सर्वात आघाडीवर असलेले नाव अमिताभ गुप्ता यांचे नाव असून गुप्ता यांनी मुंबई अतिरिक्त आयुक्त, कोकण रेंज IG, वेधमापन IG, व आता विशेष प्रधान सचिव गृह विभागात कार्यरत आहेत, गुप्ता हे सर्वात तरुण IPS अधिकारी असून शिस्तबद्ध अधिकारी म्हणून नावलौकिक आहे.दुसऱ्या स्थानावर बिपिनकुमार सिंग यांचे नाव आहे, सध्या ते अप्पर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या खालोखाल आशुतोष डुंबरे यांचेही नाव आघाडीवर आले असून ते अप्पर पोलीस महासंचालक म्हणून अॅण्टी करप्शन ब्युरोमध्ये काम पाहत आहेत. त्यांनीही यापूर्वी ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून ठाण्यात काम पाहिले आहे. प्रशांत बुरडे हे सुद्धा सध्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत असून त्यांचेही नाव आता आघाडीवर आहे. त्यांनीसुद्धा यापूर्वी ठाण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे विभागासाठी काम पाहिले आहे.तीन पक्षाचे सरकार असल्याने सर्व पक्ष आपल्या मर्जीतील अधिकारी आपल्या क्षेत्रात नियुक्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार यात शंका नाही चौघातुन कोणाची वर्णी लागेल ते मात्र गुलदस्त्यातच आहे..तथापि विधान भवन व मंत्रालयाची पायरी ही कधी न चढणारे whatsapp गुरू,तज्ञ, मंडळी मात्र आपला अंदाज वर्तव असल्याचे दिसत आहेत
ठाणे/ नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत चार नावे