ठाणे पोलीस आयुक्त पदाची कारकीर्द यशस्वी पणे गाजविणारे परमबीर सिंग यांच्या नियुक्ती ने पोलीस दलात उत्साहाचे वातावरण. ठाणे :- संजय बर्वे, भापोसे हे दिनांक २९.०२.२०२० (म.नं) रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवानिवृतीमुळे रिक्त होणाऱ्या पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई या पदावर शासनाने सन १९८८ च्या तुकडीतील परम बीर सिंह, भापोसे, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पोलीस महासंचालक दर्जाच्या बदलीने नियुक्ती केली आहे. तसेच परम बीर सिंह, भापोसे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार बिपिन के.सिंग,भापोसे (१९९०), अपर पोलीस महासंचालक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,म.रा.मुंबई यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.
मुंबई पोलीस आयुक्त पदी परमबीर सिंग यांची नियुक्ती