ठाणे :- नरेंद्र कसबे.
ठाणे :- कळवा येथे आज दिनांक ३/१२/२०१९रोजी १०.३० वा कळवा नाका या ठिकाणी एका इसमाने बांधकाम सुरू असलेल्या नवीन मोटार ब्रिजवरून फाशी लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असताना वपोनि शेखर बागडे यांनी शिताफीने व समयसूचकता दाखवत सदर ठिकाणी त्यांनी रोडवरून जाणाऱ्या क्रेनचा वापर करून सदर इसमाचे प्राण वाचवले आहेत.सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव धनाजी भगवान कांबळे वय ५० वर्षे त्याच्या मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे.बागडे यांनी याइसमाला ताब्यात घेऊन सहानुभूती पूर्वक जवळ घेऊन आपुलकी ने चौकशी केली.त्याची मानसिक स्थिती शेखर बागडे यांनी जाणुन घेतली व त्याची समजूत काढली. या कामगिरी मुळे कळवेकरांनी बागडे यांचं कौतुक केले आहे. कळवा विभागात कळवा नाक्यावर वाहतुक पोलिसांचा ताफा उभा असतो त्यांना नाकाखाली सदर व्यक्ती पुलावर चढत असल्याचे त्यांना कसे दिसले नाही असा सवाल कळवेकर करीत आहेत.सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे व PC 6877 अस्लम जमादार, RTPC 2442 संभाजी राठोड यांनी केली आहे.