एल्गार, कोरेगाव भीमा खटल्यातील आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध, पुणे पोलीस दाव्यावर ठाम

 


एल्गार, कोरेगाव भीमा खटल्यातील आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठाम दावा पुणे पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा एकदा केला. एकीकडे राज्य सरकारमधील काही नेत्यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पुणे पोलिसांनी चळवळीतील काही नेत्यांना अकारण यात गोवल्याचा आरोपही केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने पुणे सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्राच्या आधारे शुक्रवारी मांडण्यात आलेली भूमिका विसंगत आहे. एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी सखोल तपास करून, आरोपपत्र देखील दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपींचे नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याचे पुरेसे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागलेले आहेत. त्यामुळं याबाबतचा तपास NIA कडे सोपवू नये. एनआयएचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी भूमिका प्रतिज्ञापत्रात मांडण्यात आली.
दरम्यान, एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याबाबतच्या खटल्याचा निकाल १४ फेब्रुवारीला येणार आहे. पुणे सत्र न्यायालयात दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. तपास वर्ग करण्याबाबत एनआयएच्या अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला. एनआयएने केलेल्या तपासासाठी एनआयए कोर्ट आहे. तर राज्य सरकारच्या यंत्रणेने तपास केल्यास राज्य सरकारकडे विशेष न्यायालय आहे. त्यामुळे हा खटला एनआयए कोर्टाकडे देण्याची गरज नसल्याचे सरकारी वकिलासंनी सांगितले. एनआयए कायदाही तसं सांगत नसल्याचं सरकारी वकील म्हणाले. तर एनआयएच्या प्रादेशिक विभागाचं अधिकार क्षेत्र महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात पर्यंत आहे. त्यामुळे हा एनआयएच्या अखत्यारीतला विषय असल्याचं एनआयएच्या वकिलांनी सांगितले.


 


Popular posts
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
*माझे कुटुंब माझी जबाबदारी, आशांची दमदार कामगिरी* *जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा आशा स्वयंसेविकांचा संकल्प*
Image