ठाणे:- नरेंद्र कसबे
ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे "स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूज पेपर स्टॉल" या संकल्पनेवर बनवण्यात आलेल्या स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचे उदघाटन मोठ्या उत्साहात मंगळवारी करण्यात आले
यावेळी मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपलब्ध होते. ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे "स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूज पेपर स्टॉल" या संकल्पनेवर बनवण्यात आलेल्या स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचे उदघाटन आमदार संजय केळकर व जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते झाले.महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जेवण डफळे,संजय पावशे,राजीव धावरे, अजय उतेकर, संतोष पाडावे, सिद्धेश चव्हाण असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे,दिलीप चिंचोली,वैभव म्हात्रे,भरत कुथे, गणेश शेडगे यावेळी उपस्थित होते . उन, पाऊस वारा यापासून वृत्तपत्र विक्रीत्याला संरक्षण मिळेल या हेतूने हे स्टॉल बनवण्यात आले आहे. या स्टॉलला स्टॉलच्या खाली एक छोटेखानी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून जेणेकरून रिटर्नचे पेपर वगैरे, सामान ठेवता येईल. ठाणे महापालिकेने या स्टॉलला परवाना दिलेला आहे. आता या स्टॉल वरती वृत्तपत्र विक्रेते जाहिराती स्वीकारतील आणि त्यातून त्यांना अधिक मोबदलाही मिळेल. आणि यापुढे स्टॉल वरती कुरिअरचे पिकअप आणि ड्रॉप पॉईंट सुरू करण्याचे नियोजन आहे. येणाऱ्या काळात ठाण्यातील सर्व स्टॉल हे एकाच प्रकारचे असतील त्यामुळे वृत्तपत्र यांच्या स्टॉलची एक वेगळी ओळख निर्माण होईल. वृत्तपत्र विक्रेते आता महिन्याची पेपरची बिले घेण्यासाठी ऑनलाईन मोबाईल ॲप्सचा सुद्धा वापर करणार आहेत आणि ऑनलाइन ट्रांजेक्शनचा वापर करतील. त्यामुळे फक्त पेपर वरती अवलंबून न राहता, घरोघरी डिलिव्हरीचे काम करण्याचा मानस आहे.अशी माहिती यावेळी ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी दिली