गुन्हेगारांचं परफेक्ट स्केच काढणारा मराठी माणूस.

ठाणे :- नरेंद्र कसबे.


ठाणे:- आज आपण पोलीस खात्यातील एका अशा कर्तबगार माणसाला भेटणार आहोत जो पोलीस नसूनही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतो.



 CID मालिकेत तुम्ही अनेकदा स्केच आर्टिस्टला पाहिलं असेल, पण आज भेटूया एका खऱ्याखुऱ्या स्केच आर्टिस्टला. नितीन महादेव यादव हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिसांसाठी गुन्हेगारांचे स्केच काढून देण्याचं काम करत आहेत. त्यांनी आजवर काढलेल्या ४००० स्केचेस मधून तब्बल ४५० स्केचेसच्या आधारे गुन्हेगारांना यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. आज जाणून घेऊया पोलीस खात्याचा अविभाज्य भाग असलेल्या नितीन महादेव यादव यांच्याबद्दल.कुर्ल्याच्या साबळे चाळीत राहणारे नितीन यादव हे त्यांच्या मित्रपरिवारात हाफ-पोलीस म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाची लिस्ट जर बघितली तर त्यांची कर्तबगारी पोलिसांपेक्षा कमी नाही. गेल्या २५ ते एक रुपयाही न घेता पोलिसांसाठी गुन्हेगारांची चित्रे काढत आहेत. या कामात त्यांचा हातांना विलक्षण देणगी लाभली आहे.नितीन यादव यांचा प्रवासाला सुरुवात झाली ती त्यांच्या लहानपणी. कामगारांच्या ज्या संपाने मुंबईचा चेहरामोहरा बदलला त्याचा मोठा फटका हा नितीन यादव यांच्या कुटुंबाला बसला होता. ७ वी इयत्तेत असतानाच त्यांना शाळा सोडावी लागली होती. पोटापाण्यासाठी ते नंबर प्लेट्स, बॅनर, इत्यादी रंगवण्याचं काम करायचे.एकेदिवशी पोलीस स्टेशन मध्ये ते चौकीचा बोर्ड आणि नावाच्या पाट्या रंगवत होते. त्याचवेळी पोलीस स्टेशन मध्ये एक केस आली. GSK हॉटेल मध्ये हत्या झाली होती. हॉटेलच्या वेटरनेच फक्त चहा देताना गुन्हेगाराचा चेहरा पाहिला होता. नितीन यादव पोलिसांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं, ‘जर तुम्ही वेटरला बोलतं केलत तर मी त्याच्या वर्णनावरून खुन्याचं चित्र काढू शकतो.’ पोलिसांनी मंजुरी दिली. नितीन यादव यांच्या स्केचच्या आधारे गुन्हेगार केवळ ४८ तासात पकडला गेला. त्यावेळी ते १० वीत शिकत होते.लहान वयात त्यांच्या हातांनीच त्यांचा पुढचा मार्ग शोधला होता. या कर्तबगारीनंतर त्यांचा प्रवास सुरु झाला. आजवर अनेक महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपास कामात त्यांनी मदत केली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर २०१३ चं शक्तीमील बलात्कार प्रकरण, पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, आणि नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण अशा महत्वाच्या कसेस मध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.त्यांचा त्यांच्या कामातील हातखंडा दाखवणारा एक किस्सा पाहा. ज्यावेळी अजमल कसाबवर खटला चालू होता तेव्हा फोटोग्राफर्सना कोर्टात येण्यास बंदी होती. एका पत्रकाराने त्यांना गाठून त्यांना कोर्टरूमचं वर्णन ऐकवलं. या वर्णनावरून त्यांनी कोर्टरूम मधला हुबेहूब प्रसंग चितारला होता. हे स्केच वर्तमानपत्रातही छापून आलं होतं.नितीन यादव यांच्या कामाचा खरा कस लागतो तो संवेदनशील प्रकरणांमध्ये. बलात्कार पिडीत मुलीकडून गुन्हेगाराची माहिती काढून घेणे हा काहीसा क्रूर पण अपरिहार्य भाग असतो. अशा केसेस मध्येही नितीन यादव यांनी सफाईने माहिती काढून घेतली आहे. ‘काहीवेळा चित्र एवढं ‘परफेक्ट’ असतं की पिडीत मुलीला अश्रू अनावर होतात.’ असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.१० वर्षापूर्वी कॅन्सरसाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि ते नुकतेच बरे होत होते तेव्हा एक बलात्काराची केस त्यांच्याकडे आली. या केस मध्ये मुलगी कर्णबधीर आणि मुकबधीर होती. तिच्याकडून माहिती काढणं हे जवळजवळ अशक्य होतं. यावर त्यांना एक मार्ग सुचला. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शरीराच्या भागाचे जसे की चेहऱ्याचे, केसांचे, त्वचेच्या रंगाचे, जेवढे म्हणून चित्रांचे नमुने होते ते पिडीत मुलीच्या समोर ठेवले. मुलीने नमुन्यातील एकेक गोष्टींची निवड केली आणि गुन्हेगाराचा चेहरा तयार झाला. तो गुन्हेगार पुढील ७२ तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात होता.त्यांच्या कामासाठी त्यांना मुंबई पोलीस खाते व शैक्षणिक खात्याचे मिळून १६४ पुरस्कार मिळाले आहेत. पोलिसांना मदत करण्यासोबत ते चेंबूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. पोलीस खात्याशी निगडीत सगळ्यांनाच जीवे मारण्याची धमकी ही येतेच. याला नितीन यादवही अपवाद नाहीत. पण कोणताही अडथळा त्यांना त्यांच्याकामापासून लांब ठेवू शकला नाही.२५ वर्षांपासून त्यांनी कामासाठी एक रुपयाही घेतलेला नाही, पण मागील काही वर्षापासून पोलीस खाते स्वतःहून त्यांना पैसे देऊ करते.बलात्काराच्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांची एक अट असते. एकदा का गुन्हेगार पकडला गेला की ते त्याला एक सणकून कानाखाली देणार. त्यांची ही अट पोलिसांनी चक्क मान्यही केली आहे.तर मंडळी अशा या पडद्यामागच्या हिरोचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. फक्त एवढंच म्हणू शकतो की ‘तुमच्या कामाला सलाम!!’....


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.