ठाणे -: समाजातील वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे (इ 1 ली ते 8वी पर्यंतचे ) शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात सुरु आहे. ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपातील 25% प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत आहे. तरी सर्व पालकांनी दिनांक २९ फेब्रुवारी २०२० या दिनांकापूर्वी आपल्या पाल्याचा अर्ज निश्चित (CONFIRM ) करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याचा ऑनलाईन (online) अर्ज भरून या प्रक्रियेत सहभागी व्हावे.असे आवाहन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांनी केले आहे.
आरटीई प्रवेशाची अंतिम मुदत २९ फेब्रुवारी ; पालकांनी अर्ज निश्चित (CONFIRM ) करणे आवश्यक