१०० युनिट्स मोफत विजेच्या चर्चेने महावितरणला घाम; ८ हजार कोटींचा फटका __________________________________

 


१०० युनिट्स मोफत विजेच्या चर्चेने महावितरणला घाम; ८ हजार कोटींचा फटका
__________________________________


राज्यात दरमहा १०० युनिट्सपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय झाल्यास त्याचा फायदा सुमारे सव्वा कोटी ग्राहकांना होईल. मात्र, यामुळे महावितरणला वर्षाकाठी आठ हजार कोटींचे नुकसान होईल. आधीच ७ हजार कोटींची तूट आणि भविष्यातील ६० हजार कोटींचे नुकसान टाळण्यासाठी वीजदरवाढीची मागणी करणाऱ्या महावितरणला संभाव्य निर्णयामुळे घाम फुटला आहे.दरमहा १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. शिवसेनेनेही तसे वचन होते, परंतु तसा निर्णय महावितरणला परवडणारा नसल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.महावितरणची घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीज ग्राहकांकडील बिलांची वसुली ७० हजार कोटींच्या आसपास आहे. त्यांचे सुमारे १ कोटी ९५ लाख घरगुती ग्राहक आहेत. त्यांच्याकडून वर्षाकाठी २५ हजार कोटींची वसुली होते. एक कोटी २८ लाख ग्राहक १०० युनिटपर्यंत वीज वापरतात. त्यांना मोफत वीज दिल्यास आठ ते साडेआठ हजार कोटींचा महसूल बुडेल, तसेच २०० युनिटपर्यंत वीज वापरणार्या २७ लाख ग्राहकांना मोफत वीज दिल्यास तूट आणखी ६ हजार कोटींनी वाढेल.महावितरणची कोंडी टाळण्यासाठी सरकारकडे क्रॉस सबसिडीवा अनुदान हे पर्याय आहेत. कृषी पंपांना सवलतीसाठी उद्योगांकडून जादा दर आकारला जातो. १०० युनिट्सपर्यंत मोफत वीजपुरवठ्यासाठी क्रॉस सबसिडीचा मार्ग स्वीकारल्यास उर्वरित ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडेल. त्यातून असंतोष निर्माण होईल. सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. कर्ज वाढत आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी निधी नाही, अशा परिस्थितीत अनुदान देणे सरकारला परवडेल का, हा प्रश्न आहे.


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.