इंदोरीकर महाराजांवर अ‍ॅट्रोसिटी दाखल होणार?

ठाणे :-  निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी जातीवाचक/जातीचा अपमान होईल अन् चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केले असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्मकार समाजाचा तसेच संविधानाचा अवमान झाला असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे.  या संदर्भात चौकशी करुन दोन दिवसात अ‍ॅट्रोसिटी, संविधानाचा अवमान आणि मराठा समाजाला दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अंबोरे यांनी दिले आहे.
 राजाभाऊ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  http / m. facebook. com / story. php & story fbid=2766417530116524 id1000002449110032 and sfnsn = wiwspwa  extid=mk85t4RYMRDGRENo and=w and vh=I ‘r &.या लिंकवरील निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आरक्षणावरुन दिशाभुल करणारे किर्तन इंदोरीकर हे करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये ते म्हणतात की अरे जाती-बिती सरकारने काढल्या. सुताराला घर फुकाट द्या मराठयाचं पाडून टाका. चांभाराचं साहेब करुन टाका मराठयाचा वरातीला सोडा. नाचू द्या. आख्खी रात... नोकरीला गेल्यावर त्याची जात पहा... नोकरीला गेल्यावर पहिली काय पाहता? जात.. अन् आपल्याला नाव काय दिलंय सरकारनं खुला.. जन्माला आल्यावर खुला.. मरताना खुला मध्ये बी खुला... ज्याला जमिन नाही त्याला पाईन लाईन, ज्याला विहीर नाही त्याला मोटार, आपण खुला! तमच्या जातीचा मिळाल्यावर आमचा घरी डांबता, पण तर तरी घ्याल का नाही? अशी विधाने करतानाच अश्लील शिवीदेखील दिली आहे.  इंदोरीकर यांच्या या विधानामुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. चांभाराला साहेब करा.. हे विधान करत असतांनाच मराठा समाजाला चर्मकारांच्या पोलीस ठाणे अंमलदार वर्तकनगर पोलीस ठाणे ’विरोधात चिथावणा देण्याचा प्रयत्न इंदोरीकर यांनी केला आहे. शिवाय,  आरक्षण हे संविधानाने दिलेले असल्याने संविधानिक तरतुदींच्या विरोधात जाहीर वक्तव्ये करुन संविधानाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे चव्हाण यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
चव्हाण यांच्या फिर्यादीवर चौकशी करुन दोन दिवसांमध्ये इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त अंबोरे यांनी सांगितले.
यावेळी अ‍ॅड. राजय गायकवाड, अ‍ॅड. राजू पराड, अ‍ॅड. निलेश मोहिते, अ‍ॅड. भुजंग मोरे, अ‍ॅड. विठ्ठल हुबळे वंचित बहुजन आघाडीचे सुखदेव उबाळे, सुरेश कांबळे, राहुल घोडके, शकुंतला अवसरमोल, रंजना म्हस्के, अमोल ढगे, अमोल पाईकराव, सुभाष अहिरे, गोपाळ विश्वकर्मा, सुखराम चव्हाण, संतोष खरात, वैभव जानराव, संभाजी काचोळे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे वर्तक नगर पोलीस ठाण्यात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


Popular posts
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image