हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम सरकारच्या वतीने पीडितेची बाजू मांडणार आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणी राज्यभरात संताप आहे. पीडित तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही होत आहे. तसंच या प्रकरणातील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी होते आहे.