मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
ठाणे : - ठाणे जिल्हा माहिती कार्यालय ठाणे रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन ठाणे आणि अष्टविनायक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त काव्यानंद महोत्सव मराठी जनजागृती प्रभात फेरी आयोजन उद्या दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता श्रीराम विद्यालय मंदिराचे पटांगण येथे करण्यात आले आहे
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी डॉ नारायण तांबे, जयंत भावे , प्रफुल्ल उज्जगरे आदी उपस्थित राहणार आहेत.
जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रोटरीयन राजेंद्र झेंडे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन