विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार

 


विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार


'बालक पालक','यलो', 'डोक्याला शॉट' सारख्या दर्जेदारचित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी 'अ विवा इनएनप्रॉडक्शन' अंतर्गत मराठीसिनेसृष्टीला आशयपूर्ण, भावनिक आणित्यासोबतच मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. यातील 'यलो' या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून 'बालक पालक', 'डोक्याला शॉट' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या यशानंतर आता उत्तुंग ठाकूर यांचा 'विकून टाक'  हा धमाल, विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उत्तुंगने चित्रपट निर्मितीचे धडे परदेशातून घेतले असून तो आता मराठी सिनेमासृष्टीमध्ये चांगल्या विषयांवर चित्रपटांची निर्मिती करत आहे.   
 'विकून टाक' चित्रपटाबद्दल उत्तुंग सांगतो, “सुरुवातीला ‘विकून टाक’ चित्रपटाची कथा सिद्धेश्वर एकांबे याने मला ऐकवली होती. मला कथेचा विषय आवडला परंतु ही कथा थोडी 'ब्लॅक कॉमेडी'कडे झुकणारी होती. कथा ऐकल्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी मला समीर पाटील यांचे नाव लक्षात आले. कारण आम्हा दोघांनाही एकत्र काम करायचे होते. त्यानंतर मी आणि समीर यांनी एकत्र भेटून या चित्रपटाची कथा ऐकली आणि सिद्धेश्वरच्या परवानगीने या कथेत थोडा बदल करत थोड्या विनोदी पद्धतीने हा विषय मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. ‘विकून टाक’ हा चित्रपट जरी विनोदी असला तरीही हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करतो,'' असे ही उत्तुंग सांगतो. उत्तुंगच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे बॉलिवूडसोबत असलेले कनेक्शन. त्याने निर्मिती केलेल्या चित्रपटांमध्ये बॉलिवूडमधल्या दिग्गज कलाकारांचा सहभाग हा असतोच. 'विकून टाक' या चित्रपटामध्ये सुद्धा बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये काम करत आहेत.  दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तुंग चित्रपटासाठी फक्त आर्थिक सहभाग न दाखवता चित्रपटाच्या सगळ्या प्रक्रियेकडे वैयक्तिक लक्ष देतो. समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ या चित्रपटामध्ये शिवराज वायचळ, चंकी पांडे,रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले,हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर 'अ विवा इनएन प्रॉडक्शन' च्या या चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून चित्रपटाची कथा सिद्धेश्वर एकांबे यांची आहे. तर पटकथा चारुदत्त भागवत आणि समीर पाटील यांनी लिहिली आहे. ‘विकून टाक’ हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.


Popular posts
कोरोनाच्या काळात डायरेक्ट सेलिंग मधील उद्योजकांचा सन्मान सोहळा.... कोरोनाचा काळ अजून पण सुरू आहे, त्यात अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिले आहे, त्यात आपल्या लहान उद्योगांना जी झळ पोहचली आहे ती न भरून काढणारी आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरळीत ठेवला आणि खासकरून या व्यवसायिकांमध्ये डायरेक्ट सेलिंग करणारे उद्योजक खूप प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो त्या परिस्थितीत डायरेक्ट सेलिंग करणे अशक्य अस होत कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, डायरेक्ट सेलिंगसाठी आपल्याला एकमेकांना भेटावं लागत पण या कोरोनाच्या काळात आपण सगळे एकमेकांन पासून दूर असताना देखील डायरेक्ट सेलिंग मधील काही उद्योजक आहेत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. त्या उद्योजकांना या कोरोनाच्या काळात प्रोत्साहन देण्यासाठी "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" या कंपनीद्वारा "डायरेक्ट सेलिंग अवार्ड" आणि "बिझनेस अवॉर्ड" हे दोन महत्वाचे पारितोषिक यशस्वी उद्योजकांना देण्यात येणार आहे. "बेस्ट कंपनी चॅंपियन अवार्ड" "बेस्ट बिझनेसमन अवार्ड" "बेस्ट प्रोडक्ट्स आणि म्यानूफॅचरिंग" "बेस्ट टैनर अवार्ड" २०२१" असे सगळे मिळून ४५ अवॉर्ड या सोहळ्यात देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजे या कोरोनाच्या काळात ज्यांनी सामजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना "समाज रत्न पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहे तसेच "उत्कृष्ठ सामाजिक संस्था २०२१" हा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हा बिझनेस अवॉर्ड सोहळा २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल "हॉलिडे इन" अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंञी, सिने कलाकार, न्यायधीश, खेळाडू, मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण दिले आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड देण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारी नियम पाळून सोशल डिस्टंट ठेऊन आणि मास्क वापरून हा प्रोग्राम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत "ऐम्पाॅवर ट्रेनर प्राव्हेट लिमिटेड" द्वारे एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा लहानसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न गेल्या ६ वर्षांपासून निरंतर चालू आहे आणि ही परंपरा कधीही खंडित होणार नाही हाच आमचा निश्चय आहे. असे ऐम्पाॅवरचे संचालक घनश्याम कोळंबे यांनी सांगितले आहे .
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.
Image
३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२१ उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन.
Image
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा.
Image
ठाण्यातील तीन रस्ते ‘मॉर्निग वॉक’साठी आरक्षित.